ETV Bharat / sports

स्टोक्सने पंचाना 'त्या' धावा मागितल्या नव्हत्या; न्यूझीलंडचा खेळ बिघडवणाऱ्या 'ओव्हर थ्रो'चा खुलासा

ओव्हर थ्रो विषयावर बेन स्टोक्सचा सहकारी जेम्स अँडरसन म्हणतो, स्टोक्सने बॅट लागल्याने माफी मागितली आणि त्याने पंचाना आपला निर्णय मागे घेण्यास सांगितले. मात्र, असे घडले नाही, असे त्याने सांगितले.

स्टोक्सने पंचाना 'त्या' धावा मागितल्या नव्हत्या; न्यूझीलंडचा खेळ बिघडवणाऱ्या 'ओव्हर थ्रो'चा खुलासा
author img

By

Published : Jul 17, 2019, 7:28 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 50-50 षटकात आणि सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत सुटला. तेव्हा चौकारांच्या नियमानुसार, इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आले. या सामन्यात पंचाचा 'तुघलकी' कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अंतिम सामन्यात टर्निंग पॉईंन्ट ठरला तो 50 व्या षटकातील ओव्हर थ्रो, या ओव्हरथ्रो वर पंचानी इंग्लंडला 3 धावा बहाल केल्या. दरम्यान, या ओव्हरथ्रोचा धक्कादायक खुलासा इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्सचा एकेकाळचा सहकारी जेम्स अँडरसनने केला आहे.

जेम्स अँडरसनचा खुलासा -
या विषयावर बेन स्टोक्सचा सहकारी जेम्स अँडरसन म्हणतो, स्टोक्सने बॅट लागल्याने माफी मागितली आणि त्याने पंचाना आपला निर्णय मागे घेण्यास सांगितले. मात्र, असे घडले नाही, असे त्याने सांगितले.

नेमकं काय घडलं होतं -
न्यूझीलंडने अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडसमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला शेवटच्या 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. तेव्हा मैदानात असलेल्या बेन स्टोक्सने ट्रेट बोल्टच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवर जोरदार फटका लगावला आणि सोबतचा फलंदाज आदिल रशिदला दोन धावांसाठी कॉल केला.

तो चेंडू सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्टिन गुप्टिलजवळ गेला. गुप्टिलने चेंडू पकडून थ्रो केला, तेव्हा तो चेंडू बाद होण्याच्या भीतीने सुर मारलेल्या बेन स्टोक्सच्या बॅटला लागला आणि चौकार गेला. यावर पंचानी इंग्लंड पळून काढलेल्या 2 धावा आणि ओव्हरथ्रोचा चौकार असे मिळून 6 धावा बहाल केल्या. हा सामन्याचा मुख्य टर्निंग पॉईंन्ट ठरला.

दरम्यान, आयसीसीचा पाच वेळा बेस्ट अंपायरचा पुरस्कार प्राप्त सायमन टाफेल यांनी पंचाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. नियमानुसार इंग्लंड 5 धावा द्यायला हव्या होत्या. असे टाफेल म्हणाले. या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर बाद नसताना त्याला बाद ठरवण्यात आले. नियमानुसार पहिल्यास चेंडू अंगाला लागल्यास पळून धाव घेता येत नाही. मात्र, तो चेंडू सीमारेषेबाहेर चौकार गेल्यास त्या धावा संघाच्या खात्यात लिहल्या जातात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.