ETV Bharat / sports

अस काय घडलं? ज्यामुळं BCCI ने मुंबईतील ऑफिसला लावले टाळे..!

author img

By

Published : Mar 16, 2020, 8:28 PM IST

बीसीसीआयने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या मुंबईच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे.

BCCI to shut down office from Tuesday in wake of COVID-19 pandemic, employees told to work from home
अस काय घडलं, ज्यामुळं BCCI ने मुंबईतील ऑफिस केला बंद, जाणून घ्या कारण

मुंबई - कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरात जणू या विषाणूच्या दहशतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार म्हणून घोषित केलं आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या मुंबईच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे.

  • BCCI to shut down office from Tuesday in wake of COVID-19 pandemic, employees told to work from home

    — Press Trust of India (@PTI_News) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. या विषाणूच्या भीतीने जगभरातील अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याची एकदिवसीय मालिका पहिल्या सामन्यानंतर अचानक रद्द करण्यात आली. तसेच २९ मार्चपासून सुरू होणारी, भारतातील सर्वात मोठी लीग स्पर्धा अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ही स्पर्धा आता १५ एप्रिलपासून सुरुवात होईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.

दरम्यान, चीनमधून फैलाव झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरातील १०० हून अधिक देशात झाला आहे. जगभरात १,५०,००० च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आहेत. तर भारतातही याची संख्या १०० पार झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून यावर युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा - VIDEO : PSL लीगमध्ये नजीर-आफ्रिदीत रंगली टशन, पाहा काय झालं ते...

हेही वाचा - VIDEO : शोएब म्हणतो.. भारताला युद्ध नकोय; भारताची भरभराटी व्हायला हवी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.