चेन्नई Rishabh Pant Test century : तब्बल 637 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतनं धमाकेदार शतक झळकावलं. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 39 धावा करुन पंत बाद झाला. मात्र आता दुसऱ्या डावात त्यानं अवघ्या 124 चेंडूत आपलं सहावं कसोटी शतक पूर्ण केलं. 128 चेंडूत 109 धावा करुन तो बाद झाला. यासह त्यानं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची (सहा शतके) बरोबरी केली.
PANT IS BACK.
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
ONE-HANDED SIX IS BACK.
Test cricket is kicking again in India. pic.twitter.com/8QnZxjpGnE
109 पैकी 76 धावा चौकार-षटकाराच्या माध्यमातून : सातवेळा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरलेल्या ऋषभ पंतनं शतकी खेळी करताना 13 चौकार आणि चार षटकार मारले. यासह एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतानं बांगलादेशविरुद्ध 450 धावांपोक्षा जास्त आघाडी मिळवली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकत्र फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली होती. या स्टेडियममधील तिसऱ्या डावातील भारतासाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. मोहिंदर अमरनाथ आणि मोहम्मद अझरुद्दीन (190 वि. इंग्लंड) पहिल्या क्रमांकावर आहेत.
WELL PLAYED, PANT...!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
109 runs from just 128 balls including 13 fours & 4 sixes, A knock to remember forever, Welcome back, Pant. 👊 pic.twitter.com/TZMG400Khg
धोनीच्या विक्रमाशी बरोबरी : वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋषभ पंतनं महेंद्रसिंग धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता तो धोनीसह भारतासाठी सर्वाधिक शतकं झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. धोनीनं सहा कसोटी शतकं झळकावण्यासाठी 144 डाव खेळले होते तर ऋषभ पंतनं केवळ 58 डावांमध्ये हा टप्पा गाठला.
A CENTURY on his return to Test cricket.
— BCCI (@BCCI) September 21, 2024
What a knock this by @RishabhPant17 👏👏
Brings up his 6th Test ton!
Live - https://t.co/jV4wK7BgV2…… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/A7NhWAjY3Z
मृत्यूच्या जबड्यातून वाचला : ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी इथं आपल्या कुटुंबाकडे जात होता, तेव्हा 30 डिसेंबर 2022 रोजी रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि प्रथम डिव्हायडरला धडकली आणि नंतर ती जळून खाक झाली. या अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला, गुडघ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मुंबईत त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता ऋषभ पंत क्वचितच क्रिकेट खेळू शकेल, असं जाणकारांनी तेव्हा सांगितलं होतं. पण या युवा यष्टिरक्षकानं हिंमत हारली नाही आणि मेहनतीच्या जोरावर आज पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवलं. दोन महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.
The Rishabh Pant heritage! 🫡
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 21, 2024
- A Test century by Pant returning after 634 days. 🤯pic.twitter.com/V8bQ3y7RCf
हेही वाचा :