मुंबई - आयपीएल सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असे असताना देखील बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे. याविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती दिली. वेळापत्रकाचे काम आज (गुरुवार) पूर्ण होईल, त्यानंतर उद्या (शुक्रवार) पर्यंत त्याची घोषणा केली जाईल, असे गांगुली यांनी सांगितले.
का होतोय वेळापत्रकासाठी उशीर -
आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत आहेत. पहिली गोष्ट तर कोरोनाचे संकट. कोरोनामुळे युएई सरकारने वाहतुकीबाबत कडक नियमावली बनवली आहे. यात क्वारंटाइनचे नियम पाहता वेळापत्रकाचे नियोजन करणे, कठीण ठरत आहे. या कारणाने बीसीसीआय युएई सरकारशी बोलणी करत आहे. दुसरी समस्या म्हणजे, युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरण आहे. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबूधाबी येथे आहे. त्यामुळे अबूधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबूधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परिणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
पण, आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, आयपीएलमधील काही खेळाडूंनी व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात लसिथ मलिंगा, सुरेश रैना, केन रिचर्डसन या सारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.
हेही वाचा - तेवढ्या वेळात धोनी संपूर्ण संघाला बाद केला असता; सरफराजची मिस स्टम्पिंग, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - सुरेश रैनासाठी चेन्नई संघाची दारं कायमची बंद? व्हॉट्सअॅप ग्रुपमधून हकालपट्टी