मुंबई - वनडे विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडून (BCCI) १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीकडून विश्वचषकासाठी भारताचा संघ निवडण्यात आला आहे. या संघात दिनेश कार्तिक, विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे तर पंतला स्थान मिळाले नाहीय.
आयसीसी विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. विश्वचषकाची सुरुवात ३० मे ला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.
असा आहे विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
-
#TeamIndia for @ICC #CWC19 💪💪#MenInBlue 💙 pic.twitter.com/rsz44vHpge
— BCCI (@BCCI) April 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia for @ICC #CWC19 💪💪#MenInBlue 💙 pic.twitter.com/rsz44vHpge
— BCCI (@BCCI) April 15, 2019#TeamIndia for @ICC #CWC19 💪💪#MenInBlue 💙 pic.twitter.com/rsz44vHpge
— BCCI (@BCCI) April 15, 2019