ETV Bharat / sports

संजय मांजरेकरांची हकालपट्टी! ..बीसीसीआयचा निर्णय - बीसीसीआयने मांजरेकरांना काढले न्यूज

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गेल्या तीन विश्वचषकासाठी आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येही समालोचन केले आहे. १९९६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून संजय मांजरेकर सातत्याने समालोचन करत आहेत. कामावर नाराज असल्याने बीसीसीआयकडून मांजरेकरांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

BCCI has Removed Sanjay Manjrekar from their commentary panel
संजय मांजरेकरांची हकालपट्टी!..बीसीसीआयचा निर्णय
author img

By

Published : Mar 14, 2020, 3:38 PM IST

Updated : Mar 14, 2020, 4:54 PM IST

मुंबई - प्रसिद्ध क्रिकेट समालोचक संजय मांजरेकरांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हकालपट्टी केली आहे. समालोचकाच्या यादीतून मांजरेकरांना काढून टाकण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने या वृत्ताचा खुलासा केला.

हेही वाचा - रिचर्डसननंतर 'या' खेळाडूची केली कोरोना चाचणी...संघातूनही वगळलं

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गेल्या तीन विश्वचषकासाठी आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येही समालोचन केले आहे. १९९६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून संजय मांजरेकर सातत्याने समालोचन करत आहेत. कामावर नाराज असल्याने बीसीसीआयकडून मांजरेकरांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी आयपीएलमध्येही मांजरेकरांना समालोचन करता येणार नसल्याचे समोर आले आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे मांजरेकर नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. रविंद्र जडेजा आणि मांजरेकर यांचे ट्विटर वादही अनेकदा चर्चेचा विषय ठरले होते.

Last Updated : Mar 14, 2020, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.