नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, दिल्लीतील प्रदूषणाची पातळी पाहता हा सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी होत होती. मात्र, बीसीसीआयने सामना होणारच असा पावित्रा घेतला. बांगलादेशचा संघ भारतात पोहोचला असून त्यांच्या खेळाडूंवर मास्क लावून सराव करण्याची वेळ आली आहे.
दिवाळीमुळे दिल्लीत वाढलेले प्रदूषण या कारणाने, भारत-बांगलादेश सामना दुसरीकडे हलवण्यात यावा. अशी मागणी, पर्यावरण तज्ञांनी मंगळवारी केली होती. या संदर्भात तज्ञांनी बीसीसीआयला पत्रही दिले होते. यामुळे हा सामना होणार की नाही, याबाबत शंका होती.
-
Delhi: Bangladesh cricket team practices at the Arun Jaitley Stadium, ahead of the 1st T20i against India on November 3. #IndvsBan pic.twitter.com/yDXVixZgDj
— ANI (@ANI) October 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Bangladesh cricket team practices at the Arun Jaitley Stadium, ahead of the 1st T20i against India on November 3. #IndvsBan pic.twitter.com/yDXVixZgDj
— ANI (@ANI) October 31, 2019Delhi: Bangladesh cricket team practices at the Arun Jaitley Stadium, ahead of the 1st T20i against India on November 3. #IndvsBan pic.twitter.com/yDXVixZgDj
— ANI (@ANI) October 31, 2019
बीसीसीआयने यावर दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा केली. तेव्हा मंडळाने वातावरण चांगले राहिल असे सांगितल्याने सामना होणार असे बीसीसीआयने जाहीर केले. पण आता दिल्लीच्या वातावरणाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना आता संकटात सापडला असल्याचे म्हटले जात होते.
दरम्यान, सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सामन्यावर प्रदूषणाचा परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दिल्ली सरकार हवेतील प्रदूषण दूर करून शुद्ध आणि मोकळी हवा घेता यावी, यासाठी उपाययोजना करीत असल्याची त्यांनी ग्वाही दिली होती.
भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी सरावासाठी बांगलादेशचा संघ मैदानात उतरला असून त्यांच्यावर मास्क लावून सराव करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेचे खेळाडू येथे मास्क घालून खेळले होते. त्यातील काही खेळाडू नंतर आजारीही पडले होते.
हेही वाचा - 'निवड समितीच्या सदस्याला मी विराटच्या पत्नीची हुजरेगिरी करताना पाहिलयं'
हेही वाचा - बीसीसीआयचा भोंगळ कारभार..! पैसे न दिल्याने, भारतीय संघ अडकला परदेशात