ETV Bharat / sports

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा; शाकिबची वापसी - बांग्लादेश वि. वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिका

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघाने घोषणा केली आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची संघात वापसी झाली आहे.

bangladesh-one-day-team-announced-against-west-indies
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा; शाकिबचे पुनरागमन
author img

By

Published : Jan 17, 2021, 6:54 AM IST

ढाका - वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघाने घोषणा केली आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची संघात वापसी झाली आहे. तो मॅच फिक्सिंग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.

बांग्लादेशचा संघ पहिल्यांदाच तमीम इक्बालच्या नेतृत्वात पहिली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बांग्लादेश बोर्डाने मेहदी हसन, हसन महमूद आणि शोरिफूल इस्लाम या तिघांची निवड १८ सदस्यीय संघात अनकॅप्ड खेळाडू म्हणून केली आहे. दरम्यान, बांग्लादेशचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मुशरफे मोर्तजाला संघातून वगळण्यात आले आहे.

वेस्ट इंडीजचा संघ बांग्लादेशमध्ये दाखल झाला असून सद्या खेळाडू विलगीकरण आहेत. कोरोना चाचणीत विंडीजचा फिरकीपटू हेडन ज्यूनियर वॉल्श पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू असून तो या मालिकेत खेळणार नाही.

असा आहे बांग्लादेशचा एकदिवसीय संघ -

तमीम इक्बाल (कर्णधार), शाकिब अल हसन, नजमुल हुसैन, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, महमूदुल्लाह, अफीफ हुसैन, सौम्या सरकार, तस्कीन अहमद, रूबेल हुसैन, तैजुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, हसन महमूद आणि शोरिफुल इस्लाम.

हेही वाचा - अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या वडिलांचे निधन

हेही वाचा - गाबा कसोटी : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, रोहित-शुबमन माघारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.