दुबई - आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ कोरोना योद्ध्यांना मानवंदना देणार आहे. आयपीएलच्या तेराव्या पर्वात आरसीबीचा संघ आपल्या जर्सीवर त्यांच्यासाठी एक संदेश देईल. फ्रेंचायझीने गुरुवारी ही माहिती दिली.
फ्रेंचायझीने म्हटले, "या खऱ्या योद्धांच्या प्रयत्नांचा आणि त्यागांचा सन्मान केला जाईल. बंगळुरूचा संघ प्रशिक्षण आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान 'माय कोविड हीरोज' या संदेशासह जर्सी घालेल. खेळाडू सर्व मृत कोविड नायकांना श्रद्धांजली वाहतील आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्यांची प्रेरणादायक कहाणी शेअर करतील.''
-
The RCB team will proudly don a tribute jersey with the message “My Covid Heroes” both during training & matches during the #Dream11IPL in honour of all the Real Challengers who have helped the world during these uncertain times. 🌟🌟🌟#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/yazAHvHmBQ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The RCB team will proudly don a tribute jersey with the message “My Covid Heroes” both during training & matches during the #Dream11IPL in honour of all the Real Challengers who have helped the world during these uncertain times. 🌟🌟🌟#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/yazAHvHmBQ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 18, 2020The RCB team will proudly don a tribute jersey with the message “My Covid Heroes” both during training & matches during the #Dream11IPL in honour of all the Real Challengers who have helped the world during these uncertain times. 🌟🌟🌟#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/yazAHvHmBQ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 18, 2020
संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ''मला बंगळुरू संघाची 'माय कोविड हीरोज'ची जर्सी घालून खूप अभिमान वाटतो. त्यांनी अहोरात्र संघर्ष केला आणि त्यांना माझे नायक म्हणून सांगताना मला त्यांचा अभिमान वाटतो."
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज सलामीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा भारतात होणार होती. मात्र, कोरोनामुळेही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे.