मेलबर्न - ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीनंतर देखील बायो सिक्युर बबलमध्ये राहणार आहे. यामुळे त्यांना बिग बॅश लीगसाठी पुन्हा आयसोलेट व्हावे लागणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्याची मालिका १९ जानेवारीला समाप्त होईल. त्यानंतर प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासह बिग बॅश लीगचे १६ सामने खेळवले जाणार आहेत.
मोयसेस हेनरिक्स (सिडनी सिक्सर्स), मायकल नेसर (एडिलेड स्ट्राइकर्स), मिशेल स्वेप्सन (ब्रिस्बेन हीट), जेम्स पॅटिन्सन आणि मार्कस हॅरिस (मेलबर्न रेनेगेड्स) हे नियमित बिग बॅश लीगमध्ये खेळत असतात.
ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नरची वापसी
बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत विल पुकोव्सकी परतले आहेत. तर खराब कामगिरी करणाऱ्या जो बर्न्सला संघातून वगळण्यात आले आहे.
भारताची मालिकेत बरोबरी -
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमवत पहिल्या पराभवाचा वचपा काढला. अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या. या विजयामुळे भारताने 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्यला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा - 'हिटमॅन' रोहित शर्माचे टीम इंडियात जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा अपघात