सिडनी - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्ड्सन न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत खेळणार आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली असल्याने रिचर्ड्सनची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीमध्ये त्याचा अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे.
![Australian pacer Kane Richardson tests negative for COVID-19](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6395978_fdfdf.jpg)
हेही वाचा - सौराष्ट्राने जिंकलं रणजीचं पहिलवहिलं विजेतेपद
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केन रिचर्ड्सनच्या या कोरोना संदर्भातील चाचणीची माहिती दिली. रिचर्ड्सन तंदुरुस्त असल्याने तो सिडनी येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी जात असल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या प्रोटोकॉलमुळे केनला वेगळे ठेवण्यात आले. केनच्या घशाच्या संक्रमणावर उपचार सुरू होते.
भारतात रुग्णांचा आकडा 75, तर महाराष्ट्रात 17 बाधित -
देशभरांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. आत्तापर्यंत 75 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.