ETV Bharat / sports

जिथे क्रिकेटचा देवही होतो नतमस्तक.. विक्रमांचा बादशहा, 'नाईटहूड' आणि बरंच काही.. - सर डॉन ब्रॅडमन विशेष लेख न्यूज

क्रिकेट विश्वात अनेक विक्रम रचणाऱ्या ब्रॅडमन यांनी २५ फेब्रुवारी २००१ म्हणजेच १९ वर्षांपूर्वी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी २० वर्ष राज्य केलं.

australian legend sir don bradman special story about records and stats
महान फलंदाज, विक्रमांचा बादशहा, 'नाईटहूड' आणि बरंच काही..
author img

By

Published : Feb 25, 2020, 4:16 PM IST

Updated : Feb 25, 2020, 6:13 PM IST

हैदराबाद - जेव्हा क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांची चर्चा असते तेव्हा सर डॉन ब्रॅडमनचे नाव हमखास घेतले जाते. क्रिकेट विश्वात अनेक विक्रम रचणाऱ्या ब्रॅडमन यांनी २५ फेब्रुवारी २००१ म्हणजेच १९ वर्षांपूर्वी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी २० वर्ष राज्य केलं. ब्रॅडमननंतर अनेक फलंदाज क्रिकेट क्षेत्रात यशस्वी झाले मात्र, त्यांचे काही विक्रम आजही अबाधित राहिले आहेत.

australian legend sir don bradman special story about records and stats
सर डॉन ब्रॅडमन

फलंदाजीत ९९ पेक्षा जास्त सरासरी -

सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या. अनेक फलंदाजांनी त्यांची ही धावसंख्या नंतर ओलांडली असली तरी, आजवर एकाही फलंदाजाने त्यांच्या 'अद्भूत' सरासरीला स्पर्श केलेला नाही. ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत १९ शतके ठोकली. १९३० रोजी इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दौऱ्यात त्यानी वैयक्तिक ३३४ धावांचा विक्रम नोंदवला होता. हा विक्रम नंतर मोडला गेला, पण त्यावेळी डावात त्रिशतक झळकावणं एखाद्या स्वप्नासारखं होतं. १९३४ मध्ये त्यांनी इंग्लंडविरूद्ध परत एकदा त्रिशतक झळकावलं.

अवघ्या तीन षटकांत ठोकलं शतक -

तीन षटकात शतक हे आजच्या वेगवान क्रिकेटजगात स्वप्नासारखंच भासतं. मात्र, ही किमयादेखील ब्रॅडमन यांनी ८९ वर्षांपूर्वी करून दाखवली. त्यांनी या खेळीत १४ षटकार आणि २९ चौकारांसह एकूण २५६ धावा केल्या होत्या.

'नाईटहूड'चा किताब -

ऑस्ट्रेलियाच्या या मातब्बर क्रिकेटपटूला 'नाईटहूड'चा किताबही मिळाला. २० वर्षे क्रिकेटला वाहून देणाऱ्या ब्रॅडमन यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १९२८ मध्ये केली. एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झालेला नसल्याने त्यांनी संपूर्ण आयुष्य कसोटी क्रिकेटला दिलं.

सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम -

कसोटीत सर्वाधिक दुहेरी शतक ठोकण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी एकूण १२ वेळा द्विशकाची पायरी ओलांडली. ब्रॅडमननंतर या क्रमवारीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराचे नाव आहे. त्याने ११ द्विशतके ठोकली आहेत.

सर डॉन ब्रॅडमन यांची कारकिर्द -

ब्रॅडमन यांनी २० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ५२ सामने खेळले. त्यांनी ८० डावांमध्ये ६९९६ धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी २९ शतके आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये २७ ऑगस्ट १९०८ रोजी जन्मलेल्या ब्रॅडमन यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. डिसेंबर २००० मध्ये त्यांनी न्यूमोनियाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, ते घरीही परतले होते. परंतु वयामुळे शरीरानेही साथ देणे थांबवलं होतं. २५ फेब्रुवारी २००१ रोजी या सार्वकालिन महान खेळाडूने आपला अखेरचा श्वास घेतला.

Last Updated : Feb 25, 2020, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.