लंडन - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस गुरुवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. दुखापतीमुळे स्टॉयनिसला विश्वकरंडक स्पर्धेत मागच्या २ सामन्यांना मुकावे लागले होते. स्टॉयनिसने स्पर्धेमध्ये आतापर्यंत ३ सामने खेळताना ४ गडी बाद केले आहेत.
-
Marcus Stoinis bowled well at training today and Head Coach Justin Langer says he remains a chance to play against Bangladesh on Thursday. #CmonAussie #CWC19 pic.twitter.com/5V0CpeF7sW
— Cricket Australia (@CricketAus) June 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Marcus Stoinis bowled well at training today and Head Coach Justin Langer says he remains a chance to play against Bangladesh on Thursday. #CmonAussie #CWC19 pic.twitter.com/5V0CpeF7sW
— Cricket Australia (@CricketAus) June 18, 2019Marcus Stoinis bowled well at training today and Head Coach Justin Langer says he remains a chance to play against Bangladesh on Thursday. #CmonAussie #CWC19 pic.twitter.com/5V0CpeF7sW
— Cricket Australia (@CricketAus) June 18, 2019
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रात भाग घेतला होता. त्यामुळे तो गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. दुखापतग्रस्त झाल्याने स्टॉयनिसच्या जागी शॉन मार्शला संघात स्थान देण्यात आले होते.
आयसीसी क्रिकेट विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत ५ सामने खेळले असून, त्यातील ४ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. सध्याच्या गुणतालिकेत कांगारु ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत.