सिडनी - ऑस्ट्रेलियाची स्थानिक क्रिकेट स्पर्धा शेफिल्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेत फलंदाज विचित्र पद्धतीने बाद झाला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हिल्टन कार्टराईट याने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटवर जोरदार आदळला. लार्किन हेल्मेटमुळे बचावला खरा परंतु, हेल्मेटला चेंडू लागून हवेत उडाला. गोलंदाज जेसन संघाने हा झेल पकडल्यामुळे हिल्टन कार्टराईटला बाद देण्यात आले.
Of all the ways to get out 🙈#SheffieldShield | #NSWvWA pic.twitter.com/iTLUxQ3CfF
— #7Cricket (@7Cricket) February 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Of all the ways to get out 🙈#SheffieldShield | #NSWvWA pic.twitter.com/iTLUxQ3CfF
— #7Cricket (@7Cricket) February 26, 2019Of all the ways to get out 🙈#SheffieldShield | #NSWvWA pic.twitter.com/iTLUxQ3CfF
— #7Cricket (@7Cricket) February 26, 2019
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि सिडनी न्यू साउथ वेल्स यांच्यात सामन्यातील चौथ्या दिवशी हा प्रकार घडला. या घटनेनंतर क्षेत्ररक्षकला तपासण्यासाठी फिजीओ आणि इतर कर्मचारी मैदानात दाखल झाले. परंतु, क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
नियमात झाले आहेत बदल
२०१७ सालापूर्वी कोणताही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटवर लागल्यावर त्या चेंडूला बाद ठरवण्यात येत होते. परंतु, आता नियमात बदल झाला असून जर फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून झेल झाल्यास फलंदाजाला बाद देण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजचा चेंडू लागून झालेल्या मृत्युनंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१६-१७ साली हा नियम स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठी लागू केला होता. यानंतर आयसीसीने २ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात हा नियम लागू केला.