राजकोट - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला. या विजयाने भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. विजयासाठी 341 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 304 धावांवर गारद झाला. मार्नस लबूशेन 46 (47) आणि स्टीव्ह स्मिथ 98 (102) यांनी भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मोहम्मद शमीने 3, तर नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
-
Clinical performance by #TeamIndia to beat Australia by 36 runs and level the series 1-1. Onto the decider in Bengaluru. #INDvAUS pic.twitter.com/H808C2tbot
— BCCI (@BCCI) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Clinical performance by #TeamIndia to beat Australia by 36 runs and level the series 1-1. Onto the decider in Bengaluru. #INDvAUS pic.twitter.com/H808C2tbot
— BCCI (@BCCI) January 17, 2020Clinical performance by #TeamIndia to beat Australia by 36 runs and level the series 1-1. Onto the decider in Bengaluru. #INDvAUS pic.twitter.com/H808C2tbot
— BCCI (@BCCI) January 17, 2020
त्यापूर्वी, सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने पाहुण्यांसमोर ५० षटकात ६ बाद ३४० धावांचा डोंगर उभारला आहे. सलामीची जोडी यशस्वी झाल्यानंतर, विराट आणि राहुलनेही आपली जबाबदारी चोख पार पाडत संघाची धावसंख्या साडेतीनशेपर्यंत पोहोचवली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा - रणजीत 'त्रिशतक' ठोकलेल्या क्रिकेटपटूनं पंतला केलं 'रिप्लेस'
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी ८१ धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्मा ४२ धावांवर बाद झाला. फिरकीपटू अॅडम झम्पाने त्याला पायचित पकडले. त्यानंतर आलेल्या विराटने धवनला सोबत घेत सावध फलंदाजी करत संघाच्या डावाला आकार दिला. धवनने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना १३ चौकार आणि एका षटकारासह ९६ धावा केल्या. त्याला केन रिचर्ड्सनने माघारी धाडले. धवन बाद झाल्यानंतर, मुंबईकर श्रेयस अय्यरही अपयशी ठरला. झम्पाने त्याचा त्रिफळा उडवला. संघाच्या २७६ धावा असताना विराटही बाद झाला. त्याने ६ चौकारांसह ७८ धावांची खेळी केली. कोहली नंतर फॉर्मात असलेल्या केएल राहुलने संघाची कमान आपल्या हातात घेतली.
मनीष पांडे अवघ्या २ धावांवर बाद झाल्यानंतर राहुलने रविंद्र जडेजाला सोबत घेत धावफलक हलता ठेवला. डाव संपण्यापूर्वी राहुल ८० धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर,जडेजा २० धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झम्पाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर, केन रिचर्ड्सनला २ बळी मिळाले.
मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात दहा गड्यांनी पराभव झाल्यानंतर भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य होता. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियात गोलंदाज शार्दुल ठाकूर ऐवजी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले होते. तर, यष्टीरक्षणाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती.
हेही वाचा - आजपासून रंगणार वर्ल्डकपचा थरार, आफ्रिका-अफगाणिस्तान येणार आमनेसामने