मेलबर्न - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. दोनही संघ एकमेकांविरुद्ध ३२ वर्षानंतर 'बॉक्सिंग डे' कसोटी खेळत आहेत. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५७ धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथ ७७ आणि ट्रेव्हिस हेड २५ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ज्यो बर्न शून्यावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेनने अर्धशतकी भागिदारी केली. वॅगनरने वॉर्नरचा (४१) अडथळा दूर केला.
-
In the end it was Australia's day.
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Steve Smith goes to stumps at 77 not out.#AUSvNZ scorecard: https://t.co/Q5Lvt45rWO pic.twitter.com/h49gX7n17x
">In the end it was Australia's day.
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2019
Steve Smith goes to stumps at 77 not out.#AUSvNZ scorecard: https://t.co/Q5Lvt45rWO pic.twitter.com/h49gX7n17xIn the end it was Australia's day.
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2019
Steve Smith goes to stumps at 77 not out.#AUSvNZ scorecard: https://t.co/Q5Lvt45rWO pic.twitter.com/h49gX7n17x
लाबुशेन आणि स्मिथने संघाचे शतक धावफलकावर लावले. यादरम्यान, लाबुशेनने आपले व्यक्तिगत अर्धशतक झळकावलं. त्याला ग्रँडहोमने त्रिफाळाचित करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर मॅथ्यू हेडलाही (३८) त्यांने बाद केले. न्यूझीलंडकडून कोलिन डी ग्रँन्डहोमने २ तर ट्रेट बोल्ट आणि नील वॅगनरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
'बॉक्सिंग डे' कसोटीत न्यूझीलंडने आपल्या संघात दोन बदल केले. दुखापतीतून सावरल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टला संघात स्थान देण्यात आले आहे. तर जीत रावलच्या ठिकाणी टॉम ब्लंडेल संधी मिळाली आहे.
हेही वाचा - '२०१९ विश्वकरंडकात धोनी कर्णधार असता, तर आपण विश्वविजेते असतो'
हेही वाचा - टीम इंडिया जानेवारीत ७ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार