ETV Bharat / sports

IND VS AUS : ऋषभ पंतला दुखापत, वृद्धीमान साहा यष्टीरक्षणासाठी मैदानावर - rishabh pant injured news

ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात ऋषभ पंत क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. पंत ऐवजी यष्टीरक्षणासाठी वृद्धीमान साहा मैदानात उतरला. बीसीसीसीआयने ट्विट कर पंतच्या दुखपतीचे स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Australia vs India, 3rd Test: Rishabh Pant "Taken For Scans" After Being Hit On Left Elbow While Batting
IND VS AUS : ऋषभ पंतला दुखापत, वृद्धीमान सहा यष्टिरक्षणासाठी मैदानावर
author img

By

Published : Jan 9, 2021, 11:36 AM IST

सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये रंगला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांत आटोपल्यानंतर भारतीय फलंदाजीदरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. यामुळे त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल नेण्यात आले आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. ऑस्ट्रेलियाचे वेगवान त्रिकूट पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क हे भारतीय फलंदाजांविरूध्द बाऊंसरचा मारा करत होते. यादरम्यान, पॅट कमिन्स फेकलेला चेंडूचा ऋषभ पंतला अंदाज आला नाही. पंतला हा चेंडू बाऊन्सर येईल असे वाटले. मात्र चेंडूने उसळी न घेतल्यामुळे तो पंतला लागला. यात पंतच्या डाव्या कोपऱ्याला जोराचा मार बसला. पंतला झालेल्या दुखापतीमुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पंतने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. परंतु त्याला फार काळ संघर्ष करता आला नाही. तो हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात ऋषभ पंत क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. पंत ऐवजी यष्टीरक्षणासाठी वृद्धीमान साहा मैदानात उतरला. बीसीसीसीआयने ट्विट कर पंतच्या दुखपतीचे स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, याआधीच दुखापतीमुळे इशांत , शमी, आणि उमेश यादवसारखे अनुभवी खेळाडू बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकले आहेत.

हेही वाचा - भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी पुन्हा संकटात, ब्रिस्बेनमध्ये लॉकडाऊन

हेही वाचा - Ind vs Aus, 3rd Test : पंचाच्या निर्णयावर भडकला टिम पेन; हुज्जत घालत वापरले अपशब्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.