पर्थ - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात पर्थ येथे प्रकाशझोतात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २९६ धावांनी जिंकला. मिचेल स्टार्कने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. त्याचा गोलंदाजीसमोर किवीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आणि यजमान संघाने चौथ्या दिवशीच विजय साजरा केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना, मार्नस लबूशेनचे शतक (१४३) आणि ट्रेविस हेडचे (५६) अर्धशतक याच्या जोरावर पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम साऊथी आणि नील वेग्नर यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.
-
Australia win!
— cricket.com.au (@cricketcomau) December 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The hosts take a one-nil lead in the Trans-Tasman Series after a comprehensive 296-run win. #AUSvNZ pic.twitter.com/1sCkDeYD2G
">Australia win!
— cricket.com.au (@cricketcomau) December 15, 2019
The hosts take a one-nil lead in the Trans-Tasman Series after a comprehensive 296-run win. #AUSvNZ pic.twitter.com/1sCkDeYD2GAustralia win!
— cricket.com.au (@cricketcomau) December 15, 2019
The hosts take a one-nil lead in the Trans-Tasman Series after a comprehensive 296-run win. #AUSvNZ pic.twitter.com/1sCkDeYD2G
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात २१७ धावा करु शकला. रॉस टेलरने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. मात्र, तो वगळता इतर फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा सामना करण्यात अपयशी ठरले. मिचेल स्टार्कने ५ गडी बाद करत किवींचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात जो बर्न्स (५३) आणि मार्नस लबूशेनने (५०) अर्धशतकी खेळी केली आणि न्यूझीलंडला ४६८ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य दिले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डावही गडगडला आणि संपूर्ण संघ १७१ धावांवर ढेपाळला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथल लिऑनने प्रत्येकी ४ गडी बाद केले.
सामन्यात ९ गडी बाद करणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय संघात दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात २६ डिसेंबरपासून रंगणार आहे.
हेही वाचा - पाकिस्तानच्या आबिद अलीचा विश्वविक्रम, एकदिवसीयनंतर पदार्पणाच्या कसोटीत ठोकलं शतक
हेही वाचा - शाहीद आफ्रिदीचा लाजिरवाणा विक्रम, शून्यावर बाद होण्याचं पूर्ण केलं 'शतक'