मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने श्रीलंकेविरुध्दचा तिसरा एकदिवसीय सामना ९ गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने मालिका विजयासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १८ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे.
-
18 games. 18 months. 18 wins. This Australian ODI team really is something special #AUSvSL pic.twitter.com/MMEVUB6IRq
— cricket.com.au (@cricketcomau) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">18 games. 18 months. 18 wins. This Australian ODI team really is something special #AUSvSL pic.twitter.com/MMEVUB6IRq
— cricket.com.au (@cricketcomau) October 9, 201918 games. 18 months. 18 wins. This Australian ODI team really is something special #AUSvSL pic.twitter.com/MMEVUB6IRq
— cricket.com.au (@cricketcomau) October 9, 2019
तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर चमारी अटापट्टूच्या १०३ धावांच्या जोरावर लंकेने निर्धारीत ५० षटकात ८ बाद १९५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य २६.५ षटकात १ गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. एलिसा हिलीने नाबाद ११२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दरम्यान, एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा हा सलग १८ विजय ठरला आहे. यापूर्वी, १९९७ ते १९९९ या काळात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बेलिंड क्लार्कच्या नेतृत्वात महिला क्रिकेटमध्ये सलग १७ वनडे सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला होता. मात्र, हा विक्रम ऑस्ट्रेलियाची कर्णधार मॅग लॅनिंग याने मोडला.
हेही वाचा - भारताचा आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय, प्रियाची पदार्पणातच दणकेबाज खेळी
हेही वाचा - धडाकेबाज..! महिलांमध्ये असा विक्रम करणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू