ETV Bharat / sports

'अरे.. कोरोनाला गांभीर्याने घ्या, अन् खबरदारी बाळगा' - उस्मान ख्वाजा

कोरोना विषाणू हा विषय आपण गंभीरतने घेत याविषयी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच आपण फक्त स्वत: विषयी विचार न करता दुसऱ्याचाही विचार करावा, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाने केलं आहे.

australia batsman usman khawaja has urged everyone to take the threat of coronavirus seriously
'बाबानों कोरोनाला गंभीरतेने घ्या अन् खबरदारी बाळगा'
author img

By

Published : Mar 22, 2020, 4:52 PM IST

Updated : Mar 22, 2020, 5:23 PM IST

मेलबर्न - कोरोना विषाणू हा विषय आपण गंभीरतने घेत याविषयी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच आपण फक्त स्वत: विषयी विचार न करता दुसऱ्याचाही विचार करावा, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाने केलं आहे. ख्वाजाने यासंदर्भात ट्विट करत हे आवाहन केलं आहे.

ख्वाजा म्हणतो की, कोरोना विषाणुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून याकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून आपली जबाबदारी आहे की, आपण वृद्ध नागरिकांविषयी विचार केला पाहिजे. तसेच कोरोनामुळे सामाजिक तथा आर्थिक होणारे परिणाम याचाही विचार करायला हवा. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून खबरदारी बाळगायला हवी.

  • Just because the mortality rates for Covid-19 for many isn't high, doesn't mean you should have a blasé attitude. It's our responsibility as a society to think about the elderly and the social and economical cost this will have on so many lives. We all need to do our part.

    — Usman Khawaja (@Uz_Khawaja) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, याआधी भारताचे खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हरभजन सिंग आदी जणांनी कोरोना विषाणूपासून खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपल्या चाहत्यांना खबरदारीचा संदेश देत आहेत.

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ३४१ जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निलंबन, महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

हेही वाचा - कोरोना कनिकाला, चिंता आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला!

Last Updated : Mar 22, 2020, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.