ETV Bharat / sports

आशिया चषकाचा 'हिरो' अथर्वचे जंगी स्वागत; ढोल-ताश्याच्या गजरात आईनेही धरला ठेका - अथर्वचे जंगी स्वागत

मायदेशी परतल्यानंतर अथर्व राहत असलेल्या अंधेरी पूर्वेकडील प्रकाशवाडीत मोठ्या प्रमाणात जल्लोषात करण्यात आला. मित्रमंडळींनी अथर्वची थाटामाटात विजयी मिरवणूक काढली. त्याला खांद्यावर बसवून नाचवले.

आशिया चषकाचा 'हिरो' अथर्वचे जंगी स्वागत, ढोल-ताश्याच्या गजरात आईनेही धरला ठेका
author img

By

Published : Sep 16, 2019, 8:04 PM IST

मुंबई - भारताला १९ वर्षांखालील (Under १९) आशिया चषक पटकावून देणारा मराठमोळा क्रिकेटपटू अथर्व अंकोलेकर याचे अंधेरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजयी मिरवणुकीत ढोल-ताश्याच्या गजरात अथर्वसोबत त्याच्या आईनेही ठेका धरला.

रविवारी आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुध्द बांगलादेश या संघामध्ये पार पडला. हा सामना रोमांचक ठरला. भारताने या सामन्यात ५ धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात अथर्वने चमकदार कामगिरी करत २८ धावांमध्ये ५ गडी बाद केले.

मुंबईत परतल्यानंतर अथर्वचे जंगी स्वागत...

हेही वाचा - चुरशीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो

मायदेशी परतल्यानंतर अथर्व राहत असलेल्या अंधेरी पूर्वेकडील प्रकाशवाडीत मोठ्या प्रमाणात जल्लोषात करण्यात आला. मित्रमंडळींनी अथर्वची थाटामाटात विजयी मिरवणूक काढली. त्याला खांद्यावर बसवून नाचवले.

कोलंबोमध्ये भीम पराक्रम केलेल्या अथर्व अंकोलेकर याने अतिशय हलाकीच्या स्थितीत प्राविण्य मिळवले आहे. त्याच्या बाबांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, त्यानंतर अथर्वची आई वैदेही अंकोलेकर यांनी अथर्वचा सांभाळ केला. त्या बेस्ट परिवहनमध्ये बसवाहक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा - पंत खेळात सुधारणा कर, अन्यथा... रवी शास्त्रींची वॉर्निंग

दरम्यान, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १०६ धावा केल्या होत्या. मात्र, अथर्वने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला. अथर्वच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Intro:अंडर नाईन्टिन क्रिकेट संघातल्या अथर्वचे मुंबईत जोरदार स्वागत, ढोल ताश्यावर धरला ताल

मुंबई १६

भारताला अंडर नाईन्टिच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंजिक्य पद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या अथर्व अंकोलेकरचे मुंबईत परतल्यावर राहत्या अंधेरी परिसरात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले . रविवारी कोलंबोत झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर नाईन्टिच्या संघातील अथर्व अंकोलेकर याने ८ षटकात २८ रण देऊन पाच बळी घेतले . त्याच्या या कामगिरीच्या जीवावर भारतीय संघाने अतिशय प्रतिकूल परिस्तिथीत बांग्लादेशच्या विरोधात विजय मिळवला होता .

कोलंबो मध्ये भीम पराक्रम केलेल्या अथर्व अंकोलेकर अतिशय हलाकीच्या स्तिथीत प्राविण्य मिळवले आहे . त्याच्या बाबांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले त्या नंतर अथर्वची आई वैदेही अंकोलेकर ह्यांनी अथर्वचा सांभाळ केला . त्या बेस्ट परिवहन मध्ये बस वाहक म्ह्णून कार्यरत आहेत . अथर्व ने दाखवलेल्या पराक्रमाचा त्याच्या मित्रांना अभिमान असून रविवारी पहाटे मुंबईतपरतल्या नंतर त्याचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले . अथर्वला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतल्या नंतर अथर्व ही स्वतःला रोखू शकला नाही , त्याने ही ढोलच्या तालावर थिरकायला सुरुवात केली .

भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निराशाजनक कामगिरी करत टीम 32.4 षटकात केवळ 106 धावा केल्या होत्या . मात्र खराब कामगिरीचा जराही परिणाम भारतीय खेळाडूंवर झाला नाही . डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या त्र्यहरवणे या अटीतटीच्या सामन्यात केवळ २८ धाव देऊन पाच बळी मिळवले . आणि बांगलादेशचा संघ १०१ धावत गारद झाला . त्याच्या कामगिरीच्या जोरावरच भारताने हा अंतिम सामना जिंकलाBody:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.