लंडन - इंग्लिश काऊंटी क्रिकेट क्लब यॉर्कशायर आणि भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यातील करार रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे हा करार रद्द करण्यात आला आहे. अश्विनसोबत केशव महाराज आणि निकोलस पूरन यांचाही करार रद्द झाला आहे. क्लबने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
यॉर्कशायरने अन्य फिरकीपटूंसोबतही करार केला होता. मात्र, अश्विन क्लबसाठी जास्त सामने खेळणार होता. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे क्लब आणि खेळाडूंनी हा एकत्र निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने क्लबसोबत काऊंटी चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी करार केला होता.