लंडन - प्रतिष्ठित अॅशेस मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याला गुरुवार पासून सुरुवात होणार आहे. हा सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात येणार असून या सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. पाचव्या कसोटीसाठी सलामीवीर जेसन रॉय आणि क्रेग ओवरटन याला अंतिम ११ मध्ये जागा देण्यात आलेली नाही.
अॅशेस मालिका २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने २-१ ने आघाडी घेतली आहे. यामुळे अंतिम सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी यजमान इंग्लंडने संघात बदल केले आहेत. इंग्लंडने जेसन रॉय आणि क्रेग ओवरटनला संघाबाहेर केले आहे. तर त्यांच्या ठिकाणी सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांना संधी दिली आहे.
हेही वाचा - 'चेंडूत फेरफार करण्यासाठी वॉर्नर हाताला चिकटपट्टी लावायचा'
चौथ्या कसोटीसाठी ख्रिस वोक्स याला वगळून ओवरटनला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आल्याने अनेक दिग्गज खेळाडूंनी संताप व्यक्त केला होता. या सामन्यात ओवरटन 'फेल' ठरला. तर जेसन रॉयही मागील काही दिवसांपासून 'आऊट ऑफ फॉर्म' आहे. यामुळे दोघांना अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. सॅम करन याने भारत विरुध्दच्या मालिकेत चांगले प्रदर्शन केल्याने, त्याला संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा - SL VS PAK : खेळाडूंच्या विरोधानंतरही श्रीलंकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा
पाचव्या कसोटीसाटी इंग्लंडचा संघ -
रोरी बर्न्स, जो डेनली, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जॉनी बेयरेस्टोव, जोस बटलर, सॅम करन, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच