लीड्स - अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने नाणेफेक करण्यासाठी विलंब झाला होता.
तिसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने कोणताही बदल केलेला नाही. तर ऑस्ट्रेलिया संघाने कॅमेरुन ब्रेनक्रॉफ्ट, पीटर सीडल आणि जखमी स्टिव स्मिथच्या ठिकाणी मार्कस हॅरिस, जेम्स पॅटिनसन, मार्नस लाबुशाने याला अंतिम ११ मध्ये जागा दिली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चरने टाकलेल्या बाऊन्सर स्टिव स्मिथच्या मानेवर आदळला. यात स्मिथला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे स्मिथ पुढील सामना खेळणार की नाही यावर साशंकता होती. मात्र, तपासणीअंती स्मिथ तिसरा सामना खेळू शकणार नाही.
सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना २५१ धावांनी जिंकला आहे. तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ १-० ने सध्या आघाडीवर आहे.
इंग्लंडचा संघ -
जो रूट ( कर्णधार), रॉरी बर्न्स, जेसन रॉय, जोए डेनली, जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
टिम पेन (कर्णधार), मार्कस हॅरिस, डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशाने, ट्रेविड हेड, मैथ्यू वेड, पॅट कमिन्स, जेम्स पॅटिनसन, नेथन लॉयन आणि जोश हेजलवुड.