नवी दिल्ली - २२ नोव्हेंबरपासून भारत आणि बांगलादेश संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ आपल्या पहिल्या दिवस-रात्र सामन्यात विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे बांगलादेश हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुलाबी चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटीसाठी खेळाडूंसह चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सामन्याच्या पहिल्या ४ दिवसांची संपूर्ण ६५ हजार तिकिटे विकली गेल्याने, सामना आधीच 'हाऊसफुल्ल' ठरला आहे. दरम्यान, हा सामना दिवस-रात्र पध्दतीने खेळवण्यात येणारा १२ वा सामना आहे. वाचा संपूर्ण दिवस-रात्र सामन्यांचे रेकॉर्ड...
भारत आणि बांगलादेश कसोटी सामन्याआधी ११ सामने खेळण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि झिंब्बाब्वे संघांनी गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत.
-
Kolkata gearing up for the #PinkBallTest 😊😊#TeamIndia #INDvBAN pic.twitter.com/16p66AvHTn
— BCCI (@BCCI) November 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kolkata gearing up for the #PinkBallTest 😊😊#TeamIndia #INDvBAN pic.twitter.com/16p66AvHTn
— BCCI (@BCCI) November 20, 2019Kolkata gearing up for the #PinkBallTest 😊😊#TeamIndia #INDvBAN pic.twitter.com/16p66AvHTn
— BCCI (@BCCI) November 20, 2019
आतापर्यंत गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेले सामने आणि विजयी संघ -
- २७ ते २९ नोव्हेंबर २०१५ ऑस्ट्रेलिया विरुध्द न्यूझीलंड, अॅडलेड - ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
- १३ ते १७ ऑक्टोंबर २०१६ पाकिस्तान विरुध्द वेस्ट इंडीज, दुबई - पाकिस्तान ५६ धावांनी विजयी
- २४ ते २७ नोव्हेंबर २०१६ ऑस्ट्रेलिया विरुध्द दक्षिण आफ्रिका, अॅडलेड - ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
- १५ ते १९ डिसेंबर २०१६ ऑस्ट्रेलिया विरुध्द पाकिस्तान, ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी
- १७ ते १९ ऑगस्ट २०१७ इंग्लंड विरुध्द वेस्ट इंडीज, बर्मिघम - इंग्लंड १ डाव २०९ धावांनी विजयी
- ६ ते १० ऑक्टोबर २०१७ पाकिस्तान विरुध्द श्रीलंका, दुबई - श्रीलंका ६८ धावांनी विजयी
- २ ते ६ डिसेंबर २०१७ ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड, अॅडलेड - ऑस्ट्रेलिया १२० धावांनी विजयी
- २६ ते २७ डिसेंबर २०१७ दक्षिण आफ्रिका विरुध्द झिब्बाब्वे पोर्ट एलिजाबेथ, दक्षिण आफ्रिका एक डाव १२० धावांनी विजयी
- २२ ते २६ मार्च २०१८ न्यूझीलंड विरुध्द इंग्लंड, ऑकलँड, न्यूझीलंड एक डाव ४९ धावांनी विजयी
- २३ ते २६ जून २०१८ श्रीलंका विरुध्द वेस्ट इंडीज, ब्रिजटाउन, श्रीलंका ४ गडी राखून विजयी
- २४ ते २६ जानेवारी २०१९ श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया एक डाव ४० धावांनी विजयी