ETV Bharat / sports

कलम 370 : 'भारत भित्रा देश, अणुबॉम्ब वापरू अन् त्यांना साफ करू'; पाकचा माजी खेळाडू बरळला

author img

By

Published : Aug 20, 2019, 10:06 AM IST

पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना जावेद मियांदाद याने, आम्ही सर्व मर्यादा पार करून भारतावर हल्ला करू, अशी धमकी दिली. तसेच त्यांनी भारत हा भित्रा देश आहे. त्यांना घाबरण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळली.

Article 370 : 'भारत 'भित्रा' देश, अणुबॉम्ब वापरु आणि भारताला साफ करू'; पाकचा माजी खेळाडू बरळला

कराची - भाजप सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. भाजपचा हा निर्णय पाकिस्तानच्या पचनी पडला नाही. यामुळे या निर्णयावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून अनेक क्रिकेटपटूंनी यावर प्रतिक्रिया दिली. यात आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने याविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना जावेद मियांदाद याने, आम्ही सर्व हद्दी पार करून भारतावर हल्ला करू, अशी धमकी दिली. तसेच त्यांनी भारत हा भित्रा देश आहे. त्यांना घाबरण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळली.

जेव्हा मियांदादाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, मी अनेक वेळा सांगितले आहे की भारत भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत काही केलेले नाही. आम्ही अणुबॉम्ब असे ठेवलेले नाही. संधी मिळाली तर भारतावर आम्ही याचा वापर करु, असे भडकाऊ विधान केले.

दरम्यान, ३७० कलम हटवल्याने पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यात प्रामुख्याने, शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, सरफराज अहमद यांचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.