मुंबई - मुंबई टी-२० लीग स्पर्धेत सोमवारी नॉर्थ मुंबई पँथर्स आणि आकाश टायगर्स एमडब्लूएस यांच्यात झालेल्या सामन्यात आकाश टायगर्सकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची दमदार गोलंदाजीसह फलंदाजी पाहायला मिळाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई पँथर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६९धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाने १९.२ षटकांमध्ये ६ गडी राखून विजय मिळवला.
एमडब्लूएस संघाकडून अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत ३ षटकामध्ये २७ धावा देत ३ गडी गारद केलेत. तर फलंदाजीस आल्यावर २४ चेंडूत २८ धावा केल्या. अर्जुनच्या या अष्ठपैलु खेळीच्या जोरावर आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाने नॉर्थ मुंबई पँथर्सवर शानदार विजय मिळवला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळल्या जाणाऱ्या मुंबई टी-२० लीग स्पर्धेत आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाने ५ लाखांची बोली लावत अर्जुन तेंडुलकर आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे.