मुंबई - क्रिकेट सल्लागार समितीचे (CAC) अध्यक्ष कपिल देव यांच्यापाठोपाठ अंशुमान गायकवाड यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल देव यांनी आपले पद सोडले होते.
हेही वाचा - डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
बीसीसीआयकडून क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यावरून 'नोटीस बजावण्यात आली होती. बीसीसीआयच्या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती एकावेळी एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही. त्यामुळे, बीसीसीआय लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांना नोटीस बजावली होती. शिवाय, या तीन सदस्यांवरील आरोपाबाबत १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.
परंतु, या तारखेअगोरदरच, सीएसीतील तीनही सदस्यांनी राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयने एक ३ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्षस्थान भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तर त्यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची निवड सदस्य म्हणून करण्यात आली होती.