ETV Bharat / sports

IND VS SA : मराठमोळ्या अजिंक्यने झळकावलं तब्बल ३ वर्षानंतर शतक

आससीसी कसोटी क्रमवारीच्या यादीत टॉप १० मध्ये विराजमान असणाऱ्या अजिंक्यने २०१६ मध्ये शेवटची शतकी खेळी केली होती. त्यानंतर अजिंक्यला तब्बल ३ वर्षानंतर शतकी खेळी साकारता आली. २०१६ मध्ये अजिंक्यने न्यूझीलंडविरुध्द १८८ धावांची खेळी केली होती.

author img

By

Published : Oct 20, 2019, 12:00 PM IST

रांची - दक्षिण आफ्रिकेविरुध्द तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने दमदार शतकी खेळी केली. अखेरच्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. तेव्हा रोहित-अजिंक्य या जोडीने द्विशतकी शतकी भागिदारी रचत भारताला सुस्थितीत आणले.

यादरम्यान, अजिंक्य रहाणेने आपले कसोटी कार्यकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. त्याने ५९.१७ च्या स्ट्राइकरेटने १६९ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदताने १०० धावा पूर्ण केल्या. अजिंक्यची रहाणे ११५ धावांवर बाद झाला.

अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे

आससीसी कसोटी क्रमवारीच्या यादीत टॉप १० मध्ये विराजमान असणाऱ्या अजिंक्यने २०१६ मध्ये शेवटची शतकी खेळी केली होती. त्यानंतर अजिंक्यला तब्बल ३ वर्षानंतर शतकी खेळी साकारता आली. २०१६ मध्ये अजिंक्यने न्यूझीलंडविरुध्द १८८ धावांची खेळी केली होती.

दरम्यान, अजिंक्यची ही आफ्रिकेविरुध्दची तीसरी शतकी खेळी आहे. यापूर्वी त्याने आफ्रिकेविरुध्द २ शतक झळकावले आहे. न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज संघाविरुध्द अजिंक्यने प्रत्येकी २ शतकं ठोकली आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुध्द त्याला प्रत्येकी एक शतक झळकवता आले आहे.

हेही वाचा - VIDEO : महिला क्रिकेटर विजयी जल्लोष करताना, प्रियकरानं केलं 'प्रपोज'..पुढं काय झालं वाचा

हेही वाचा - India Vs South Africa ३rd Test : रोहितची वाटचाल द्विशतकाकडे, रहाणे बाद

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.