दुबई - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. विराटने या मालिकेत दमदार प्रदर्शन करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. याच कामगिरीचा फायदा विराटला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. त्याने आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावरून थेट दहाव्या स्थानावर उडी मारली आहे. दरम्यान, विराटसह लोकेश राहुलला याचा फायदा झाला तर रोहित शर्माची मात्र, घसरण झाली आहे.
विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेत पहिल्या सामन्यात नाबाद ९४, दुसऱ्या सामन्यात १९ तर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाबाद ७० धावांची खेळी केली. विराटला या कामगिरीमुळे मालिकावीर पुरस्कारनं गौरविण्यात आले. याचा फायदा विराटला आयसीसी टी-२० क्रमवारीत झाला आहे. विराट मालिकेआधी १५ व्या स्थानावर होता. आता मालिकेनंतर टॉप-१० मध्ये दाखल झाला आहे. त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
-
KL Rahul ⬆️
— ICC (@ICC) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Virat Kohli ⬆️
After their 💥 performances against West Indies, the Indian duo have risen in the @MRFWorldwide ICC T20I Rankings for batting.
Updated rankings ▶️ https://t.co/EdMBslOYFe pic.twitter.com/90fnJGtksp
">KL Rahul ⬆️
— ICC (@ICC) December 12, 2019
Virat Kohli ⬆️
After their 💥 performances against West Indies, the Indian duo have risen in the @MRFWorldwide ICC T20I Rankings for batting.
Updated rankings ▶️ https://t.co/EdMBslOYFe pic.twitter.com/90fnJGtkspKL Rahul ⬆️
— ICC (@ICC) December 12, 2019
Virat Kohli ⬆️
After their 💥 performances against West Indies, the Indian duo have risen in the @MRFWorldwide ICC T20I Rankings for batting.
Updated rankings ▶️ https://t.co/EdMBslOYFe pic.twitter.com/90fnJGtksp
दुसरीकडे लोकेश राहुलने या मालिकेत पहिल्या ६२, दुसऱ्या ११ आणि तिसऱ्या सामन्यात ९१ धावा केल्या. यामुळे त्याच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहचला आहे. मात्र, रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे. विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा - मुलगी समायरा आणि रोहितची मस्ती, व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - HBD YUVI : युवराज सिंगच्या कारकीर्दीतील टॉप-५ खेळी, ज्यामुळं युवी चाहत्यांच्या स्मरणात