लखनौ - एकाना क्रिकेट स्टेडियम-बी मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने भारताचा पराभव केला. या सामन्यात पाहुण्यांनी भारतावर २ गडी राखून विजय मिळवला. सामन्यात पराभव झाला असला तरी, टीम इंडियाने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली आहे.
-
Breaking News:
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Afghanistan U 19 down India U 19 cricket team in the fifth & final match as they chased down 158 target in a close finish by 8 wickets in #Ekana B ground #Lucknow.
India U 19 win the Youth ODI series 3-2 result against Afghanistan U 19.#AfgU19 #IndiaU19 pic.twitter.com/bouO57tPsk
">Breaking News:
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 30, 2019
Afghanistan U 19 down India U 19 cricket team in the fifth & final match as they chased down 158 target in a close finish by 8 wickets in #Ekana B ground #Lucknow.
India U 19 win the Youth ODI series 3-2 result against Afghanistan U 19.#AfgU19 #IndiaU19 pic.twitter.com/bouO57tPskBreaking News:
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 30, 2019
Afghanistan U 19 down India U 19 cricket team in the fifth & final match as they chased down 158 target in a close finish by 8 wickets in #Ekana B ground #Lucknow.
India U 19 win the Youth ODI series 3-2 result against Afghanistan U 19.#AfgU19 #IndiaU19 pic.twitter.com/bouO57tPsk
हेही वाचा - सय्यद मोदी चॅम्पियनशिप : सौरभ वर्मा अंतिम फेरीत
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने १५७ धावा केल्या. अफगाणिस्तानने भारताचे हे आव्हान १५ चेंडू राखून पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून आसिफ मुसाझाईने ४२, इम्रानने ३१, शफिकउल्ला गफारीने २५ आणि आरिफ खानने १६ धावांचे योगदान दिले. भारताकडून सुतरने तीन, हेगडेने दोन आणि कार्तिक त्यागी, बन्सल आणि भदोरियाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, यजमान भारतीय संघ ४९.३ षटकांत १५७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून व्हीएस भदोरियाने सर्वाधिक २९, कुशागराने २४, कर्णधार हेगडेने १७ आणि सौरभ डागरने १६ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन, आबिद मोहम्मदी आणि शफिकउल्ला गफारी यांनी प्रत्येकी दोन, तर आरिफ खान आणि आसिफ मुसाजी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.