ETV Bharat / sports

ICC WC 2019 : भारतीय संघावर विजय मिळवण्याची संधी गमावली; गुलबदीन नैब नाराज - गुलबदीन नैब

आम्ही भारताला हरवण्याची संधी गमावली. यामुळे आम्ही नाराज आहोत. विश्वकरंडक स्पर्धेत कोणत्याही बलाढ्य संघावर विजय मिळवणे ही मोठ्ठी बाब असते. कारण बलाढ्य संघ संधी देत नाहीत. आम्हाला भारताविरोधात संधी मिळाली होती. मात्र आम्ही ती गमावली, असं त्याने सांगितलं.

गुलबदीन नैब
author img

By

Published : Jun 23, 2019, 5:46 PM IST

साउथम्पटन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवावर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार गुलबदीन नैब नाराज आहे. पराभवानंतर बोलताना नैबने सांगितले की, आम्ही या सामन्यात भारताचा पराभव करण्याची संधी गमावली. अफगाणिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामने खेळले असून एकही सामन्यात विजय मिळवला नाही.

शनिवारी बाउल येथे रंगलेल्या भारत विरुध्द अफगाणिस्तान सामन्यात, अफगाणिस्तानने नाणेफेक गमावली. त्यानंतर प्रथम गोलंदाजी करत भारताला निर्धारीत ५० षटकात ८ बाद २२४ धावांवर रोखले. मात्र, हे 'टार्गेट' अफगाणिस्तानच्या फलंदाजांना पूर्ण करता आले नाही. अफगाणिस्तानने संपूर्ण संघ २१३ धावांवर ढेपाळला.

या सामन्यानंतर बोलताना कर्णधार नैबने सांगितले की, आम्ही भारताला हरवण्याची संधी गमावली. यामुळे आम्ही नाराज आहोत. विश्वकरंडक स्पर्धेत कोणत्याही बलाढ्य संघावर विजय मिळवणे ही मोठ्ठी बाब असते. कारण बलाढ्य संघ संधी देत नाहीत. आम्हाला भारताविरोधात संधी मिळाली होती. मात्र आम्ही ती गमावली, असं त्याने सांगितलं.

पुढे बोलताना नैब म्हणाला, या सामन्यात मोहम्मद नबीने आपली गुणवत्ता दाखवून दिली. त्याने सामन्यात २ विकेटासह ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मात्र, मोहम्मद शमीच्या 'हॅट्रीक'ने आमचे स्वप्न धुळीस मिळाले, असेही तो म्हणाला.

Intro:Body:

patel

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.