अबुधाबी - अफगाणिस्तानचा २६ वर्षीय खेळाडू हश्मतुल्लाह शहिदीने शेख झायेद स्टेडियमवर सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले. या कामगिरीसह हश्मतुल्लाह अफगाणिस्तानचा द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. आपल्या कारकिर्दीतील पाचवा सामना खेळणाऱ्या हश्मतुल्लाहने ४४३ चेंडूचा सामना करताना २१ चौकार आणि १ षटकारासह नाबाद २०० धावांची खेळी साकारली.
-
First Afghanistan player to score a Test double ton!
— ICC (@ICC) March 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take a bow, @Hashmat_50 🔥#AFGvZIM pic.twitter.com/rJeKIYmmXS
">First Afghanistan player to score a Test double ton!
— ICC (@ICC) March 11, 2021
Take a bow, @Hashmat_50 🔥#AFGvZIM pic.twitter.com/rJeKIYmmXSFirst Afghanistan player to score a Test double ton!
— ICC (@ICC) March 11, 2021
Take a bow, @Hashmat_50 🔥#AFGvZIM pic.twitter.com/rJeKIYmmXS
हश्मतुल्लाहच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने आपला पहिला डाव ४ बाद ५४५ धावांवर घोषित केला. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानची ही एका डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी अफगाणिस्तानने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एका डावात ३४२ धावा केल्या होत्या.
हश्मतुल्लाहच्या आधी अफगाणिस्तानकडून सर्वोच्च धावसंख्या असगर अफगान याने केली होती. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत १६४ धावांची खेळी साकारली होती.
दरम्यान, अफगाणिस्तानकडून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये तीन फलंदाजांनी शतक झळकावलं आहे. हश्मतुल्लाह, अफगान आणि रहमत शाह हे ते तीन खेळाडू आहेत. रहमत शाहने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात १०२ धावांची खेळी केली होती. तो अफगाणिस्तानचा पहिला शतक करणारा खेळाडू आहे.
हेही वाचा - 'भीमकाय' क्रिकेटरला पाहून सचिन म्हणाला, मला अशी शरीरयष्टी तयार करण्यास किती ऑम्लेट खावे लागतील?
हेही वाचा - IPL २०२१ : विराटच्या RCB संघाला जबर धक्का; 'या' खेळाडूची स्पर्धेतून माघार