मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. पण, तिची होणारी पत्नी कोण? असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला गेला. आता बुमराह कोणाशी लग्न करणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
तारा शर्मा सलुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जसप्रीत, तारा आणि तिची मुलं दिसत आहेत. या फोटोला ताराने जे कॅप्शन दिलं आहे. यावरून जसप्रीत आणि संजनाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जसप्रीत आणि संजना तुम्हाला तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. 'तारा शर्मा शो' मधील तुझ्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला दोघांना एकत्र ६व्या पर्वात पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तुझ्या संपुर्ण कुटुंबाला खूप शुभेच्छा, अशा आशयाचे कॅप्शन ताराने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे.
दरम्यान, जसप्रीत आणि संजना १४-१५ मार्चला गोव्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हा लग्न सोहळा मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - IND vs ENG: पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव; इंग्लंडची आघाडी
हेही वाचा - IND VS ENG : पराभवानंतर सहकाऱ्यांवर भडकला विराट, म्हणाला.. आता चूकीला माफी नाही