जोहान्सबर्ग - क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) मंडळाच्या कार्यवाहक अध्यक्षांसह सहा सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या बोर्डाच्या सदस्यांमध्ये ख्रिस नेन्जानी यांची जागा घेणाऱ्या बेस्फरेर्ड विल्यम्स यांचाही समावेश आहे.
सीएसएने आपल्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे, की सीएसएचे कार्यकारी अध्यक्ष बेस्फरेर्ड विल्यम्स यांनी तातडीने आपल्या राजीनामा सादर केला आहे. विल्यम्स म्हणाले, की मला क्रिकेटबद्दल मनापासून प्रेम आहे आणि खेळावरील प्रेमामुळेच मी राजीनामा दिला आहे.
-
Following the Members’ Council meeting held yesterday, 25 October 2020, the Members’ Council received and accepted resignations from Board members. pic.twitter.com/S739CFsFww
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Following the Members’ Council meeting held yesterday, 25 October 2020, the Members’ Council received and accepted resignations from Board members. pic.twitter.com/S739CFsFww
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 26, 2020Following the Members’ Council meeting held yesterday, 25 October 2020, the Members’ Council received and accepted resignations from Board members. pic.twitter.com/S739CFsFww
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 26, 2020
विल्यम्सव्यतिरिक्त डोनोव्हन मे, टेबोगो सेको, अँजेलो कॅरोलिसेन, जॉन मोगोडी आणि डेव्हॉन धर्मलिंगम यांनीही सीएसए बोर्डाचा राजीनामा दिला आहे. वित्त समितीचे अध्यक्ष असलेले धर्मलिंगम हे एकमेव अपक्ष मंडळाचे सदस्य आहेत ज्यांनी रविवारी राजीनामा दिला. सदस्यांच्या परिषदेने रिहान रिचर्ड्स यांची सदस्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.