मुंबई - आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर यूएईमध्ये टी-१० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील अबुधाबी आणि नॉर्थन वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यान, एक मजेशीर घटना घडली.
झाले असे की, या सामन्यातील दुसऱ्या डावात नॉर्थन संघातील लींडल सीमन्स आणि वसीम मोहम्मद फलंदाजी करत होते. दुसरीकडे अबुधाबी संघातील खेळाडू रोहन मुस्तफा हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी वॉरियर्सच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला. सीमारेषेपार जाणारा चेंडू सहज अडवता आला असता, परंतु नेमका त्याचवेळी रोहन जर्सी बदलत होता. तरीही कसबसे अंगावरील कपडे सांभाळत तो चेंडूच्या मागे धावला. परंतु तोवर चेंडू सीमारेषेबाहेर गेला आणि फलंदाजाला चौकार मिळाला.
-
Oh Dear 😹
— AlreadyGotBanned 😄 (@KirketVideoss) February 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Maybe first time ever a fielder changing his Shirt while the ball is still in play 😄#T10 #T10cricket #AbuDhabiT10 pic.twitter.com/2SeBNOtEFf
">Oh Dear 😹
— AlreadyGotBanned 😄 (@KirketVideoss) February 2, 2021
Maybe first time ever a fielder changing his Shirt while the ball is still in play 😄#T10 #T10cricket #AbuDhabiT10 pic.twitter.com/2SeBNOtEFfOh Dear 😹
— AlreadyGotBanned 😄 (@KirketVideoss) February 2, 2021
Maybe first time ever a fielder changing his Shirt while the ball is still in play 😄#T10 #T10cricket #AbuDhabiT10 pic.twitter.com/2SeBNOtEFf
रोहनने प्रतिस्पर्धी वॉरियर्स संघाला चार धावा दान केल्या आणि या प्रकारानंतर कुणीच चिडलं नाही तर स्टेडियमवर एकच हशा पिकला. मुस्तफाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, रोहन मुस्तफा हा यूएईचा क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. त्याने ३९ एकदिवसीय आणि ४३ टी-२० सामन्यांत १५०० हून अधिक धावा केल्या आहेत. अबुधाबी संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ३ बाद १२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लींडल सिमन्स आणि वसीम मुहम्मद यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून संघाचा विजय पक्का केला. वॉरियर्सनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिका दौरा रद्द, जाणून घ्या कारण
हेही वाचा - भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत इरफान पठानची भविष्यवाणी, म्हणाला...