ETV Bharat / sports

वर्णभेदी वागणुकीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंचा गौप्यस्फोट!

भारतीय फलंदाज अभिनव मुकुंद आणि माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या दोघांनी क्रिकेटमध्ये सामना करावा लागलेल्या वर्णभेदी वागणुकीबद्दल भाष्य केले. यावेळी गणेशने मुकुंदची एक जुनी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट मुकुंदने ट्विटरवर 2017 मध्ये शेअर केली होती.

abhinav mukund and ganesh doda talk about racism on the cricket field
वर्णभेदी वागणूकीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंचा गौप्यस्फोट!
author img

By

Published : Jun 3, 2020, 6:54 PM IST

Updated : Jun 3, 2020, 8:18 PM IST

नवी दिल्ली - भारतीय फलंदाज अभिनव मुकुंद आणि माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनी क्रिकेटमध्ये सामना करावा लागलेल्या वर्णभेदी वागणुकीबद्दल भाष्य केले आहे. या दोन क्रिकेटपटूंचे वक्तव्य कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लाइडच्या मृत्यूनंतर आले आहे. अमेरिकेतील एका पोलीस कोठडीत श्वेतवर्णीय अधिकाऱ्याच्या मारहाणीत फ्लाइडचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेत हिंसक निषेध सुरू झाला आहे.

गणेशने मुकुंदची एक जुनी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट मुकुंदने ट्विटरवर 2017मध्ये शेअर केली होती. त्या दिवसांत मुकुंदला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला, असे गणेशने सांगितले आहे. गणेशने ट्विटरवर म्हटले, "अभिनव मुकुंदच्या कथेतून मला माझ्या खेळण्याच्या दिवसांत झालेल्या वर्णद्वेषी घटनांची आठवण झाली. फक्त एक भारतीय क्रिकेटपटू साक्षीदार होता. त्याने मला ताकद दिली. भारत आणि कर्नाटककडून 100 सामने खेळण्यापासून मला कोणीही थांबवू शकले नाही. "

मुकुंदने 9 ऑगस्ट 2017 रोजी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तो म्हणाला होता, "मी त्वचेच्या रंगाबद्दल वर्षानुवर्षे अपमान सहन करत आलो आहे. गोरा रंग देखणा नसतो. आपला रंग काहीही असो, उत्स्फूर्तपणे काम करा. लहानपणापासूनच त्वचेच्या रंगाकडे लोकांचा दृष्टीकोन आश्चर्यचकित करणारा आहे. "

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या मिनियापोलिसमधील पोलीस कोठडीत 46 वर्षीय फ्लॉइडचा मृत्यू झाला. डेरेक चोविन नावाच्या एक पोलीस अधिकाऱ्याने जॉर्जच्या मानेवर पाय ठेवला होता. त्यावेळी "मला श्वास घेता येत नाही", असे फ्लॉइड सारखे म्हणत होता.

Last Updated : Jun 3, 2020, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.