नवी दिल्ली - क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने टी-२० बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलप्रमाणेच बिग बॅश लीग ही ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे.
cricket.com.au ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी आंतरराष्ट्रिय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या डिव्हिलिअर्सला आपल्या संघात घेण्यासाठी बीबीएलमधील सर्वच संघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच एबीच्या मॅनेजरनेही लीगमधील अनेक संघांसोबत संपर्क साधल्याचे समोर आले आहे. निवृत्तीनंतर मला विविध देशांतील टी-२० लीगमध्ये भाग घ्यायचा आहे, असे एबीने यापूर्वीच जाहीर केले होते.
-
JUST IN: AB de Villiers eyes Big Bash stint: https://t.co/un3R6YNJeY pic.twitter.com/FHwEF7vVOe
— cricket.com.au (@cricketcomau) April 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">JUST IN: AB de Villiers eyes Big Bash stint: https://t.co/un3R6YNJeY pic.twitter.com/FHwEF7vVOe
— cricket.com.au (@cricketcomau) April 19, 2019JUST IN: AB de Villiers eyes Big Bash stint: https://t.co/un3R6YNJeY pic.twitter.com/FHwEF7vVOe
— cricket.com.au (@cricketcomau) April 19, 2019
३७ वर्षीय डिव्हिलिअर्स सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना शानदार कामगिरी करत आहे. त्याने आयपीएलच्या बाराव्या मोसमात ८ सामने खेळताना ५१.१७ च्या सरासरीने ३०७ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचाही समावेश आहे.
मी 360 डिग्री, अशी ओळख असलेल्या डिव्हिलिअर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्यांने अनुक्रमे ८ हजार ७६५ आणि ९ हजार ५७७ आणि १ हजार ६७२ धावा केल्या आहेत