मुंबई - क्रिकेट जगतात मिस्टर ३६० डिग्रीच्या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा आज ३६ वा वाढदिवस आहे. एबीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्याचा सहकारी विराट कोहलीने एबीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
विराटने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप सारा आनंद मिळो तसेच चांगलं आरोग्यही, तुझ्या परिवारासाठी खूप प्रेम. लवकरच भेटू'
-
Happy bday brother. Wish you all the happiness and good health and lots of love to the family. See you soon 💪😃@ABdeVilliers17
— Virat Kohli (@imVkohli) February 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy bday brother. Wish you all the happiness and good health and lots of love to the family. See you soon 💪😃@ABdeVilliers17
— Virat Kohli (@imVkohli) February 17, 2020Happy bday brother. Wish you all the happiness and good health and lots of love to the family. See you soon 💪😃@ABdeVilliers17
— Virat Kohli (@imVkohli) February 17, 2020
डिव्हिलियर्स आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सहकारी खेळाडू आहेत. या दोघांनी आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पण यांना आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात यश आलेले नाही.
डिव्हिलियर्स जगभरात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावे सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम आहे. त्याने केवळ ३१ चेंडूत शतक झळकावले होते. २०१८ च्या आयपीएलनंतर डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो नुकतीच पार पडलेल्या बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये ब्रिस्बेन हीटकडून खेळताना दिसला. दरम्यान डिव्हिलियर्स ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी निवृत्ती मागे घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -
SA vs ENG : इंग्लंडची निर्णायक सामन्यासह मालिकेत बाजी, मॉर्गनची दणकेबाज खेळी
हेही वाचा -
U१९ WC राडा : बदला घ्यायचा होता, यामुळं आम्ही 'ते' केलं, बांगलादेशी खेळाडूची कबुली