मुंबई - भारत-वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज(बुधवार) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील.
वानखेडे स्टेडियम विंडीज संघासाठी कायमच लकी ठरले आहे. त्यातच विंडीज संघातील खेळाडूंना आयपीएलमुळे या मैदानावर खेळण्याचा अनुभवही कामी येण्याची शक्यता आहे. भारतीय संघासाठी सलामीवीर रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंतेची बाब आहे. मात्र, घरच्या मैदानावर रोहितकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असेल. रोहित शर्माप्रमाणेच सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या 'लोकल बॉय' शिवम दुबेच्याही खेळीकचे सर्वांचे लक्ष असेल. भारतासाठी केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने आत्ता पर्यंत चांगली खेळी केली आहे.
हेही वाचा - 'मी धोनीला चांगला ओळखतो, तो कधीही स्वतःला संघावर थोपवणार नाही'
तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 15 डिसेंबरला पहिला एकदिवसीय सामना चेन्नईतील चिदंमबरम स्टडियमवर होणार आहे.
संघ-
भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.
वेस्टइंडीज - केरॉन पोलार्ड (कर्णधार), फैबियन ऐलन, शेल्डन कॉटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रैंडन किंग, एविन लुईस, खायरे पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केस्रिक विलियम्स, हेडन वॉल्श जूनियर.