मँचेस्टर - कोरोनानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजदरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रुट इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
मालिकेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानावर उतरेल तर दुसरा सामना जिकूंन मालिका खिशात घालण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ प्रयत्न करेल. कर्णधार जोर रूटच्या आगमनाने यजमानांची फलंदाजी मजबूत झाली आहे मात्र, तरीही त्यांना वेस्ट इंडिजपासून सावधान राहावे लागणार आहे. आपल्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मामुळे पहिल्या कसोटी सामन्यातून रूटने माघार घेतली होती.
संभाव्य संघ इंग्लंड संघ - रॉरी बर्नस, डोम सिब्ली, झॅक क्रॉवले, जो रूट, बेन स्टोक्स, ओला पोप, जोस बटलर, सॅम करण, डोम बेस, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ड ब्रॉड.
संभाव्य वेस्ट इंडिज संघ - जॉन कॅम्पबेल, क्रेग ब्रेथवेट, शाय होप, शॅमराह ब्रूक्स, रोस्टन चेस, जर्मेन ब्लॅकवुड, जेसन होल्डर, शेन डोर्विच, रकीम कॉर्नवॉल, केमार रोच, शेनॉन गॅब्री.