ETV Bharat / sports

विश्वविजयाची १३ वर्षे; आजच्याच दिवशी धोनीच्या संघाने जिंकला होता विश्वकरंडक - भारत टी-२० विश्वचषक २००७ विजय

२५ सप्टेंबर, २००७ला पहिल्यावहिल्या टी-२० विश्वकरंडकावर भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली आपले नाव कोरले होते. आज या घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले मात्र, करोडो भारतीयांच्या मनात अंतिम सामन्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

Team India
भारतीय संघ
author img

By

Published : Sep 24, 2020, 3:03 PM IST

नवी दिल्ली - आजपासून बरोबर १३वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने जगज्जेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला होता. २५ सप्टेंबर, २००७ला पहिल्यावहिल्या टी-२० विश्वकरंडकावर भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली आपले नाव कोरले होते. आज या घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले मात्र, करोडो भारतीयांच्या मनात अंतिम सामन्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या या विश्वकरंडकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान होता. जोहान्सबर्गच्या मैदावर हा अंतिम सामना रंगला होता. धोनीने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला गोलंदाजीसाठी निमंत्रित केले. दुखापतीमुळे सलामीवीर विरेंद्र सेहवाग अंतिम सामन्यातून बाहेर पडला होता. परिणामी युसुफ पठाणने गौतम गंभीरसह डावाची सुरुवात केली.

सलामीची जोडी चांगली सुरुवात करत असल्याचे वाटत असतानाच मोहम्मद आसिफने भारताला पहिला झटका दिला. त्याने तिसऱ्या षटकात युसुफ पठाणला १५ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ आलेला रॉबिन उथप्पाही लवकर बाद झाला. भारताची अवस्था ४०वर २ बाद अशी झाली होती. त्यानंतर गौतम गंभीरने युवराज सिंगच्या मदतीने ६३ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, १४व्या षटकात युवराजदेखील बाद झाला. त्यानंतर धोनी देखीलबाद झाला. गौतम गंभीरने एक बाजू लावून धरत केलेल्या ७५ धावा व रोहित शर्माच्या ३० धावांच्या मदतीने भारतीय संघाने २० षटकांमध्ये १५७ धावा केल्या.

१५८ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानची अवस्था ६ बाद ७७ अशी करून ठेवली होती. मात्र, मिसबाह-उल-हकने पाकिस्तानचा डाव सावरला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विश्वविजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. कर्णधार धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात या चेंडू दिला. षटकाचा दुसरा चेंडू मिसबाहने सीमेपार टोलावला व सहा धावा मिळवल्या. मात्र, त्यानंतर मिसबाहने स्कूप शॉट खेळण्याच्या नादात श्रीसंतच्या हातात सोपा कॅच दिला आणि भारतीय संघाचा विश्वविजयाचा मार्ग मोकळा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.