नवी दिल्ली - कसोटी कर्णधार जेसन होल्डर, एकदिवसीय कर्णधार कायरन पोलार्ड आणि डॅरेन ब्राव्हो यांच्यासह वेस्ट इंडीजच्या बारा खेळाडूंनी कोरोना आणि इतर वैयक्तिक कारणांसाठी बांगलादेशात जाण्यास नकार दिला आहे. पुढील महिन्यात विंडीजचा संघ बांगलादेश दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभय संघ तीन एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा - आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये टीम इंडियाची भरारी
जेसन होल्डर, कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो, शामरा ब्रूक्स, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लुईस, शाई होप, शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांनी कोरोनाच्या कारणास्तव बांगलादेश दौर्याला नकार दिला आहे. तर, फॅबियन अॅलन आणि शेन डौरीच यापुढे वैयक्तिक कारणांमुळे या दौऱ्याला नकार दिला आहे.
बांगलादेश दौर्यासाठी विंडीजच्या कसोटी संघाचे नेतृत्व अनुभवी क्रेग ब्रेथवेटकडे असेल तर जेरेमी ब्लॅकवुड उपकर्णधार असेल. त्याचबरोबर, एकदिवसीय संघाचा जेसन मोहम्मद तर, सुनील अंब्रिस उपकर्णधार म्हणून संघात असेल. १० जानेवारीपर्यंत विंडीजला बांगलादेशला जायचे असून १५ फेब्रुवारीपर्यंत तिथे थांबायचे आहे.
बांग्लादेश दौर्यासाठी वेस्ट इंडीज कसोटी संघ : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), नाकरमाह बोनर, जॉन कॅम्पबेल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, केव्हम हॉज, अल्जारी जोसेफ, काइल मेयर, शायनी मोसेले, वीरसामी परमोल, केमार रोच, रॅमन रायफर, जोमेल वेरिकन.
एकदिवसीय संघ : जेसन मोहम्मद (कर्णधार), सुनील अंब्रिस (उपकर्णधार), नाकरमाह बोनर, जोशुआ डी सिल्वा, झेमर हॅमिल्टन, केमार होल्डर, अकील हुसेन, अल्जारी जोसेफ, काइल मेयर, आंद्रे मॅककार्थी, केजरन ओटली, रॅमन पॉवेल, रॅमन रायफर , रोमारियो शेफर्ड, हेडन वॉल्श जूनियर.