सिडनी - कोरोना प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाचे १२ खेळाडू यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलिया संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. ४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत उभय संघात तीन सामन्यांची टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या १२ खेळाडूंमध्ये अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन बोर्डाने संघाचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅक्डोनाल्ड यांना इंग्लंड दौरा न करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ते आयपीएलमध्ये उपस्थित असतील. मॅक्डोनाल्ड राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
-
IPL-bound Test stars Steve Smith, Dave Warner and Pat Cummins face of hectic, but uncertain, summer schedulehttps://t.co/bquxAdTyn4 pic.twitter.com/8ddbFmRpTY
— cricket.com.au (@cricketcomau) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IPL-bound Test stars Steve Smith, Dave Warner and Pat Cummins face of hectic, but uncertain, summer schedulehttps://t.co/bquxAdTyn4 pic.twitter.com/8ddbFmRpTY
— cricket.com.au (@cricketcomau) August 14, 2020IPL-bound Test stars Steve Smith, Dave Warner and Pat Cummins face of hectic, but uncertain, summer schedulehttps://t.co/bquxAdTyn4 pic.twitter.com/8ddbFmRpTY
— cricket.com.au (@cricketcomau) August 14, 2020
आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि अँड्र्यू टाय राजस्थान रॉयल्सकडून, मिशेल मार्श, वॉर्नर, जोश फिलिप, केन रिचर्डसन हे खेळाडू सनरायझर्स हैदराबादकडून, पॅट कमिन्स कोलकाता नाइट रायडर्सकडून, ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाबकडून, मार्क, स्टॉइनिस, दिल्ली कॅपिटल्सकडून, जोश हेजलवुड चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतात.
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल यूएईमध्ये खेळली जाईल.