चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सर्व संघांनी सुरूवात केली आहे. आज या हंगामासाठी मिनी लिलाव पार पडला. यामध्ये १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंसह तीन असोसिएट खेळाडूंवर बोली लागली. यंदाच्या या लिलावात दरवर्षीप्रमाणेच परदेशी खेळाडूंना मोठा भाव मिळाला. तसेच काही भारतीय खेळाडूंवर देखील मोठी बोली लागली. वाचा आजच्या लिलावातील सर्वाधिक बोली लागलेले टॉप-१० खेळाडू कोण आहेत...
- ख्रिस मॉरिस -
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसवर तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
- कायले जेमिन्सन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सनवर तब्बल १५ कोटींची बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ही बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले.
- ग्लेन मॅक्सवेल -
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर १४.२५ कोटींची बोली लागली. रॉयल चलेंजर्स बंगळुरू संघाने मॅक्सवेलवर ही बोली लावत आपल्या संघात घेतले.
- झाय रिचर्डसन -
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला पंजाब किंग्जने १४ कोटींच्या बोलीसह आपल्या संघात दाखल करून घेतले.
- के गौतम -
अनकॅप्ट के. गौतम यंदा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने तब्बल ९ कोटी २५ लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतले.
- रायली मेरीडीथ -
ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज रायली मेरिडीथला तब्बल ८ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले.
- मोईन अली -
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ कोटींच्या बोलीसह आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
- शाहरुख खान -
तामिळनाडूचा युवा फलंदाज शाहरुख खानवर पंजाब किंग्ज संघाने ५ कोटी २५ लाखांची बोली लावून संघात दाखल करुन घेतले.