ETV Bharat / sports

Delhi Capital Team Bus : वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांकडून दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसची तोडफोड; पाच कार्यकर्त्यांना अटक - वाहतूक सेनेची तोडफोड

आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम स्थानिक व्यवसायाकांना न दिल्याने, मनसेच्या वतीने आयपीएल खेळाडूंच्या बसेस फोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना ( Five activists arrested ) कुलाबा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Delhi Capital Team Bus
Delhi Capital Team Bus
author img

By

Published : Mar 16, 2022, 4:05 PM IST

मुंबई : आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे ( Transportation of IPL players ) काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने, मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी खेळाडूंसाठी असलेल्या बसेस मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर फोडल्या. या प्रकरणी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या ( Municipal elections ) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच स्थानिकांच्या मुद्यांवर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी मनसे पूर्ण तयारी करत आहे.

  • Mumbai | An FIR has been registered against 5-6 unknown persons under sections 143,147,149,427 of IPC for allegedly attacking the Delhi Capital IPL team parked bus, police said pic.twitter.com/aED8Z1Hd5G

    — ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली कॅपिटल संघाच्या बसवर हल्ला -

दिल्ली कॅपिटल या आयपीएल ( Delhi Capital team bus ) संघाच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 143,147,149,427 अंतर्गत 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आता कुलाबा पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

  • Ministry of Home Affairs (MHA) has restored valid e-tourist visa issued for five years, which was suspended since March 2020, to nationals of 156 countries: Officials

यंदा महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवस्थेचे काम महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून ( Businesses in Maharashtra were affected ) बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून ही काहीही होत नव्हते. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक ( Sanjay Naik, President of Vahatuk Sena ) यांनी दिली आहे.

नेमकं कारण काय?

आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ही तोडफोड करण्यात आली. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या प्रवासासाठी बसेस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या आहेत. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नसल्यानेच मनेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम दिलं जावं, अशी मनसेची मागणी आहे.

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या हंगामाला 26 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. तसेच स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.