लंडन - भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपल्या गोलंदाजांना बाउंसरचा मारा करण्यास सांगितलं. या रणणितीवरुन इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांना लक्ष्य केलं आहे.
नेमके काय आहे प्रकरण -
दुसऱ्या डावात आघाडीची फळी कोसळल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत होती. या दोघांनी 9व्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी करत भारताला 271 धावांची आघाडी मिळवून दिली. या दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपल्या गोलंदाजांना शमी-बुमराह यांना बाउंसरचा मारा करण्यास सांगितलं. या रणणितीवरून मायकल वॉन याने प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड आणि जो रुट यांना धारेवर धरलं आहे.
मायकल वॉन याने फेसबूक पोस्टमध्ये लिहलं की, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचच्या 20 मिनिटे आधी आमचं पतन झाले. मी या दरम्यान, इंग्लंडकडून सर्वात खराब प्रदर्शन पाहिले. इंग्लंडने बुमराहला बाउंसरचा मारा करण्याच्या प्रयत्नात सामना गमावला. निश्चित अनुभवी खेळाडू जो रुटने निराश केले. पण यावेळी प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी यात हस्तक्षेप करायला हवा होता.
सिल्वरवूड यांनी तसा मॅजेस का रुटपर्यंत पोहोचवला नाही. त्यांनी रुटला हे काय चाललं आहे असे का विचारलं नाही. तसेच रणणिती बदलण्यास का सांगितलं नाही, मला कल्पना आहे मी जेव्हा असे कृत्य करायचो तेव्हा प्रशिक्षक डंकन फ्लेचर विचारायचे. सिल्वरवूड यांनी देखील पराभवाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे देखील मायकल वॉन म्हणाला.
दरम्यान, इंग्लंड गोलंदाजांनी बाउंसरचा मारा केला. तेव्हा शमी-बुमराह जोडीने त्यांच्या गोलंदाजीचा यशस्वी सामना करत महत्वपूर्ण भागिदारी केली. ही भागिदारी इंग्लंड संघासाठी डोकेदुखी ठरली आणि इंग्लंडने हा सामना 151 धावांनी गमावला.
हेही वाचा - IPL 2021 : RCB ने संघात केले तीन मोठे बदल, प्रशिक्षकही बदलला
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक दक्षिण अफ्रिकेसाठी महत्वपूर्ण - टेम्बा बावुमा