मुंबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि सिद्धार्थ कौल यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. या प्रसंगी त्यांनी, आपल्या चाहत्यांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन केले आहे.
चहरने लस टोचून घेतानाचा फोटो ट्विट केले आहे. यासोबत त्याने लिहले आहे की, 'आज मी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तुम्ही देखील लवकरात लवकर लस घ्या. मी आपले सर्वांचे संरक्षण करणारे पोलीस, डॉक्टर आणि फ्रंट लाईन वर्कर्सचे आभार मानतो. आशा आहे की, आपण लवकरच या महामारीत बाहेर पडू.'
कौल याने म्हटलं आहे की, 'लसीचे कवच हेच कोरोना महामारीविरोधातील युद्ध जिंकण्याचे एकमात्र साधन आहे. आज मी लसीचा पहिला डोस घेतला. तुम्ही देखील कृपा करून लस घ्या. आपण सर्वजण आपलं जीवन सुरळीत व्हावं, हाच विचार करत आहोत.'
दरम्यान, याआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह लस घेतली आहे. त्याआधी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी देखील लस घेतली आहे.
हेही वाचा - भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील सर्व सामने 'या' मैदानावर होणार
हेही वाचा - क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात एन्ट्री, ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळात आता राज्यमंत्री