ETV Bharat / sports

Womens T20 Challenge 2022 : व्हेलॉसिटी संघाच्या 'या' गोलंदाजाच्या अ‍ॅक्शनचा व्हिडिओ होतोय व्हायरल - माया सोनवणेची अनोखी बॉलिंग एक्शन

मंगळवारी, 24 मे रोजी महिला टी-20 चॅलेंजचा ( Womens T20 Challenge ) दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात दीप्ती शर्माचा व्हेलॉसिटी आणि हरमनप्रीत कौरचा सुपरनोव्हाज यांच्यात सामना झाला. जिथे दीप्ती अँड कंपनीच्या व्हेलॉसिटीने विजय मिळवला. या सामन्यात अगळ्या-वेगळ्या शैलीने एका गोलंदाजाने गोलंदाजी केली. तिच्या गोलंदाजीने सर्वांनाच हैराण केले आणि या विचित्र गोलंदाजी शैलीचा ( Bowling Action Video ) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

maya
maya
author img

By

Published : May 25, 2022, 7:40 PM IST

हैदराबाद: मंगळवारी महिला T-20 चॅलेंज 2022 चा दुसरा सामना सुपरनोव्हाज आणि यांच्यात खेळला गेला. हा सामना व्हेलॉसिटी संघाने 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात माया सोनवणे देखील व्हेलॉसिटी संघात सामील झाली होती, जिच्या गोलंदाजीच्या अनोख्या अ‍ॅक्शनमुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु आहे.

मायाची गोलंदाजी अ‍ॅक्शन ( Maya bowling action ) पाहून क्रिकेट चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर पॉल अॅडम्सची आठवण येऊ लागली आहे. पॉल अॅडम्सही त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे खूप चर्चेत राहिला आहे. मायाची बॉलिंग अ‍ॅक्शन अशी आहे, की ती पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

मात्र, तिला गोलंदाजीत काही अप्रतिम कामगिरी करता आली नाही. मायाच्या बॉलिंग अॅक्शनचे ( Maya sonawane Unique bowling action ) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत. मायाने दोन षटके टाकली आणि 19 धावा दिल्या.

23 वर्षीय मायाचा महिला टी-20 चॅलेंजमधील मंगळवारी पदार्पणाचा सामना होता. व्हेलॉसिटी नाणेफेक जिंकून सुपरनोव्हासला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कर्णधार हरमनप्रीत कौरने 51 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी तानिया भाटियाने 32 चेंडूत 36 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर सुपरनोव्हाजला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावाच करता आल्या.

हेही वाचा - Hardik Pandya Statement : माझे नाव नेहमीच विकले जाते, मला त्याचा त्रास नाही - हार्दिक पांड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.