हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. या क्रिकेट मंडळाने बऱ्याच क्रिकेटपटूंचे आयुष्य घडवले आहे. यासाठी बीसीसीआयची संपूर्ण टीम सदैव मेहनत घेत असते. आता या अनुषंगाने बीसीसीआयने नवीन क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी बेंगळुरू येथे नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची पायाभरणी (Foundation Stone of New NCA) केली आहे.
सध्या बंगळुरु येथे एक राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आहे. मात्र आता याला नवा लूक देण्यासाठी एक भव्य स्वरूप देण्यात येत आहे. गांगुलीने त्याचे फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे भव्य रूप दाखवण्यात आले आहे.
-
The new National cricket Academy @bcci pic.twitter.com/fVWMOxev5g
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The new National cricket Academy @bcci pic.twitter.com/fVWMOxev5g
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 14, 2022The new National cricket Academy @bcci pic.twitter.com/fVWMOxev5g
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 14, 2022
जय शाहने (BCCI Secretary Jai Shah) नवीन क्रिकेट अकादमीचे फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये त्याच्यासोबत सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण देखील दिसत आहेत.
-
Laid the foundation stone for @BCCI’s new NCA. It is our collective vision to have a Centre of Excellence which nurtures talent and supports the cricket ecosystem in 🇮🇳. Jai Hind! @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv @VVSLaxman281 pic.twitter.com/0EMzssMJIe
— Jay Shah (@JayShah) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Laid the foundation stone for @BCCI’s new NCA. It is our collective vision to have a Centre of Excellence which nurtures talent and supports the cricket ecosystem in 🇮🇳. Jai Hind! @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv @VVSLaxman281 pic.twitter.com/0EMzssMJIe
— Jay Shah (@JayShah) February 14, 2022Laid the foundation stone for @BCCI’s new NCA. It is our collective vision to have a Centre of Excellence which nurtures talent and supports the cricket ecosystem in 🇮🇳. Jai Hind! @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv @VVSLaxman281 pic.twitter.com/0EMzssMJIe
— Jay Shah (@JayShah) February 14, 2022
नवीन क्रिकेट अकादमीमध्ये 40 सराव खेळपट्ट्या तयार केल्या जाणार आहेत. यास 20 पेक्षा जास्त फ्लड लाइट्स लावल्या जाणार आहेत. तसेच यासोबतच येथे 250 खोल्या आणि 16 हजार स्क्वेअर फूटमध्ये जिम बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर एटीएम, बँक आणि शॉपिंग सेंटर्ससह अनेक सुविधाही उपलब्ध असतील.
टीम इंडियाचे सर्व खेळाडू, देशातील विविध राज्यांच्या संघात खेळणारे खेळाडू, कनिष्ठ स्तरावरील सर्व खेळाडूंना एनसीए मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. टीम इंडियाचा एखादा खेळाडू दुखापतीनंतर संघात पुनरागमन करत असेल, तर त्याला काही काळ इथे सराव करणे, तसेच येथील कसोटीत उत्तीर्ण होणे आवश्यक असते.